दासबोधाच्या तीन वर्षाच्या (प्रवेश, परिचय व प्रबोध) अभ्यासक्रमात दासबोधातील २०० पैकी ७२ समास अभ्यासले जातात. उर्वरित समासांसह संपूर्ण दासबोधाच्या अभ्यासाची संधी या दासबोध प्रवीण अभ्यासाने मिळणार आहे.
प्रत्येक दशकाचा एक स्वाध्याय अशा वीस स्वाध्यायांचा हा अभ्यासक्रम आहे. दरमहा एक स्वाध्याय याप्रमाणे वीस महिन्यांत हा अभ्यासक्रम पूर्ण करावा अशी अपेक्षा आहे. तरीही कांही कारणास्तव खंड पडला तर जास्तीत जास्त चोवीस महिन्यांत म्हणजे प्रवेश घेतल्यापासून दोन वर्षात हा अभ्यास पूर्ण करायचा आहे.
प्रवेश व अभ्यास प्रक्रिया : 'दासबोध प्रवीण' साठी प्रवेश घेण्यासाठी खाली दिलेल्या गूगल फॉर्मच्या लिंकवरुन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर 7276098927 या क्रमांकावर व्हाटसअॅप करुन कळवावे. फॉर्म मिळाल्यानंतर अभ्यासार्थींना त्यांचे समिक्षक कळवले जातील. त्यानंतर अभ्यासार्थींनी एकेक स्वाध्याय आपल्या नेमून दिलेल्या समिक्षकांना दरमहा पाठवायचा आहे. स्वाध्याय मिळाल्यानंतर समिक्षक अभ्यासार्थींना समिक्षण पाठवतील.
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप : पहिले पांच प्रश्न संबंधीत दशकावर आधारित असतील. पुढचा एक प्रश्न दशकाशी संबंधीत समर्थ चरित्रावर असेल. पुढचा एक प्रश्न दशकाशी संबंधीत शिवचरित्रावर असेल. त्यापुढेचे तीन प्रश्न अभ्यासार्थींनी आचरणात आणण्याचे प्रश्न असतील. या आचरणात आणण्याच्या प्रश्नांची उत्तरे समिक्षकांना पाठवायची नाहीत.
अभ्यासासाठी सुचवलेली पुस्तके / ग्रंथ :
तसेंच श्री दा अ च्या पॉडकास्ट वर आणि स्पॉटिफाय वर खालील ऑडिओ उपलब्ध आहेत. त्यांचाही उपयोग करता येईल.
या शिवाय अन्य साहित्यही आपण वापरु शकता.
जास्तीत जास्त साधकांनी हा अभ्यास करावा.
गूगल फॉर्म लिंक : https://forms.gle/UgGDhgQP2pdbtPbK7
आपण गूगल फॉर्म भरल्यावर मला मेसेज करा. मी आपणास प्रवेश देईन व दासबोध प्रवीणच्या सर्व वीस प्रश्नपत्रिका तसेच वृत्यंतर प्रकाश, तत्वार्थ रामायण आणि सार्थ दुर्वासनाप्रतिकारदशकम या पुस्तकांच्या पीडीएफ आपणास पाठवून देईन.
सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥